आपला जिल्हा
सिद्धिविनायक गणपती अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
चंदनझिरा :- येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह दि. २५ पासून चालू होत आहे.त्याची सांगता दि. 01 रोजी काल्याच्या किर्तनाने होणार आहे. दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा आरती , ६ ते ७ विष्णू सहस्त्रनामपाठ , ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण , ५ ते ६ हरिपाठ , रात्री ९ ते ११ हरिकीर्तन यावेळी ह.भ.प. केशव पवार,मुकुंद गात,दत्ता माळवंडिकर,अश्विनी कदम, रुख्मिणी हावरे, शिवाजी तळेकर, जनार्धन बोचरे व काल्याचे कीर्तन अनिल चेके यांचे कीर्तने होणार आहे.शिवमहापुरान कथा रुख्मिणी ताई हावरे यांचे होणार आहे.तरी या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे अहावान संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले.