ताज्या घडामोडी

मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार व तालुका पत्रकार संघ अध्यक्षांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे 1 फेब्रुवारीला सेलुमध्ये आयोजन.  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट , पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती

मोहन चौकेकर

मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित, रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा सेलू (जि.परभणी) येथे शनिवारी, एक फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. साई नाट्यगृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आहे. उद्घाटक म्हणून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार विशाल परदेशी यांची उपस्थिती राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख असतील, तर स्वागताध्यक्षपद माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे भुषविणार आहेत. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजयराव भांबळे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक सेलूभुषण नंदकिशोरजी बाहेती, जयप्रकाशजी बिहाणी, जिपचे माजी सभापती अशोक काकडे, मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी साहित्यिक तथा पत्रकार डॉ.आसाराम लोमटे, डी.व्ही.मुळे, कांचन कोरडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, मोहंमद इलियास, सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, संजय मुंढे, निसार पठाण, सचिव शेख मोहसिन, सतिष आकात यांनी केले आहे. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी रेवणअप्पा साळेगांवकर, रामेश्वर बहिरट, डॉ.विलास मोरे, अबरार बेग, रमेश खराडे, राहूल खपले, दिलीप मोरे, पुनमचंद खोना, संतोष गरड, महादेव गिरी, निशीकांत रोडगे, रोहित झोल, असगर खाँन, जावेद कुरेशी, श्रीपाद रोडगे, नितीन कुंभकर्ण, निरज लोया, संदीप वरकड, दिपक जडे, महेश राऊत, विठ्ठल राऊत, गणेश सवणे, वसंत आवटे, लक्ष्मण मानोलीकर, राजू हाट्टेकर, मन्सुर शेख, प्रकाश कांबळे, सचिन शिवशेट्टे, शिवराज काटकर, अनिल वाघमारे, रवी उबाळे, प्रभू दिपके आदींसह परभणी जिल्हा संयोजक सेलू् तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य पुढाकार घेत आहेत. 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!