आपला जिल्हा
चंदनझिरा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अध्यक्ष पदी आनंद धोत्रे तर उपाध्यक्ष पदी अशोक काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चंदनझिरा हनुमान मंदीर येथे शनिवार रोजी बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते शिवजयंती समिती २०२५ च्या अध्यक्षपदी आनंद धोञे यांची व उपाध्यक्ष अशोक काळे सचिव करण गाडेकर कोषाध्यक्ष संतोष महाजन तर सदस्य म्हणुन मयूर जाधव, ओमकार खांडे, लक्ष्मण धनवट, आदित्य आवटे, परमेश्वर गाडेकर, दीपक मोठे, वरून नाईक, दीपक भोसले, करन घोडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक गणेश राऊत, जगन्नाथ चव्हाण, सोमनाथ गायकवाड, आत्माराम चव्हान, प्रमोद पवार, संजय बंस्वाल, रितेश पांचरिया, दिनेश दैने, सचिन दैने, सुभाष पारे, अशोक पारे, तसेच परिसरातील शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.