साई सेवा प्रतिष्ठान पाथरी च्या वतीने युवक उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्न.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
उद्योजक होण्याची मानसिकता बनवा-जिल्हा प्रकल्प अधिकारी,कांतीक दांडगे साई सेवा प्रतिष्ठान पाथरी च्या वतीने युवक उद्योजक प्रशिक्षण शिबिर संपन्नदूरदृष्टी व योग्य आत्मविश्वास असणाऱ्या सुशिक्षित युवकांनी उद्योगजक होण्यासाठी प्रयत्न करावा. अशा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने आर्थिक सवलती देऊ केल्या आहेत, नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणांनी उद्योजक होण्याची मानसिकता बनवावी असे प्रतिपादन जालना येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी कांतीक दांडगे यांनी केले.शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी पाथरी शहरातील हॉटेल सिटी प्राईड येथे साई सेवा प्रतिष्ठान पाथरी ता.पाथरी जि. परभणी च्या वतीने युवक उद्योजक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जालना येथील जिल्हा प्रकल्पाधिकारी, कांतिक दांडगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.पणन महासंघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ थोरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हादनाना चिंचाणे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा परिषदे चे माजी सभापती देवनाथ जाधव, जालना येथील उद्योजक संतोष रासवे, गिरजावर मानोलीकर, बंडू लिंगायत, माजी नगरसेवक गोविंद हारकळ, पांडुरंग सोनवणे आदी उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक विजय वीरकर यांनी केले. युवक आणि युतींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे या आशयाचे देवनाथ जाधव, संतोष रासवे यांनी मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साई सेवा प्रतिष्ठान पाथरी चे अध्यक्ष ऍड.अशोक गालफाडे यांनी केले, साहेबराव मानोली कर यांनी आभार प्रदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमोल बोराटे, अतुल कोरडे,अनिल कोरडे, पोटे दाजी, आसेफ पठाण, संकेत नाईक, अभिजीत गालफाडे आदींनी सहकार्य केले.