जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी तयार केले नैसर्गिक रंग

जालना प्रतिनिधी
जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी तयार केले नैसर्गिक रंग
दर वर्षी प्रमाणे यंदाही जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी होळी सणासाठी स्वहस्ते नैसर्गिक रंग तयार केले.यासाठी त्यांनी घरामधील उपलब्ध असलेल्या विविध साहित्याचा वापर केला. हळद, मक्याचे पीठ,बीट रूट,पालक भाजी,मैदा व खाण्याचा रंग वापरून लाल,पिवळा,हिरवा रंग तयार केले आहे.
होळी सणाचे रंग तयार करण्याच्या या उपक्रमात दुर्गा गणेश ढेम्पे, वैष्णवी शंकर खडके,दिव्या विठ्ठल खांडेभराड, अंजली विष्णू आदमाने,टिंकल राकेश सिंह,रेणूका भगवान चकवे,भुमी दत्ता गिरी,श्रावणी सारंगधर मिसाळ,दिव्या विठ्ठल कदम या विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला.
आमच्या जीवनराव पारे विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही होळी सणासाठी नैसर्गिक रंग तयार केले आहे. घरामध्ये उपलब्ध असलेल्या विविध वस्तूंचा उपयोग करून आम्ही नैसर्गिक रंग तयार केले आहे.होळी सण नैसर्गिक रंग वापरून खेळला तर त्या पासून कोणत्याही प्रकारचा आरोग्यावर परिणाम होत नाही.
होळीचे रंग तयार करण्यासाठी आम्हाला शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे यांनी मार्गदर्शन केले.
कु.अंजली विष्णू आदमाने
वर्ग -8 वी
जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जालना.