सावळें सुंदर रूप मनोहर ! राहो निरंतर हृदयी माझे !! आणिक कांही इच्छा आम्हा नाही चाड ! तुझें नाम गोड पांडुरंगा !!

जालना प्रतिनिधी
सावळें सुंदर रूप मनोहर ! राहो निरंतर हृदयी माझे !! आणिक कांही इच्छा आम्हा नाही चाड ! तुझें नाम गोड पांडुरंगा !!
श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे श्रीराम नवमी निमित्त व तसेच श्री केशवराज यांची प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळा दिनांक ०१-०४ २५ ते ०३-०४-२५ रोजी संपन्न झाला श्री केशव शिवणी ग्राम यांचे आराध्य दैवत श्री केशवराज यांची पूर्णाकृती मुर्त ही नेपाळ येथील गंडकी पाषाणापासून अर्थात कृष्णशिला या पाषाणापासून बनविण्यात आली, गेल्या तीन ते चार वर्षापासून गोवा येथील शिल्पकलेमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झालेले श्री पुता स्वामी गुडीकर यांनी श्री केशव राजाची मूर्त अतिशय सुरेख व सुबक नक्षीदार काम करून तेजपुंज अशी ही मूर्त यांनी तीन ते चार वर्षापर्यंत या शिल्पकाराने मूर्तीमध्ये आपला जीव ओतून सदर मुर्त घडवण्याचे काम या शिल्पकारांनी केले. अतिशय सुबक व सुंदर मूर्ती तयार झाली असून त्या शिल्पकाराने त्या मूर्तीमध्ये आपला जीव ओतून यांच्या कुशाग्र व कौशल्य गुणांनी परिपूर्ण कुशल कोरीव नक्षीदार काम करून व मूर्तीमध्ये नवचैतन्य स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम या शिल्पकाराच्या कलेतून दिसून येते ,श्रीराम नवमीच्या मुख्य पर्वावर या सोबतच काही दानशूर दात्यांनी काही देवादिकांच्या पूर्णाकृती मूर्ती या संस्थांनला भेट दिल्या, त्यामध्ये श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान श्री केशवराज संस्थान चे विश्वस्त तथा अध्यक्ष यांनी श्रीराम प्रभूची कृष्णशिला दगडातील व संत ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्त तसेच संत शिरोमणी महाराज यांची पूर्णाकृती मूर्त तसेच सौ रुक्मिनाबाई सुरेश कुलथे यांनी गंडकी पाषाणातील सुरेख अशी पार्वतीची मूर्त केशवराज संस्थानला अर्पण केली. त्याचबरोबर सौ वेणूबाई सूर्यप्रकाश उदावंत व प्रयाग बाई मुरलीधर बुट्टे यांनी मुक्ताबाईची सुरेख व सुंदर मूर्त श्री केशवराज संस्थान यांना अर्पण केली. त्याचबरोबर भाजपा प्रवक्ते विनोद भाऊ वाघ यांनी श्री गणेशाची पुणाकूती मुर्त केशवराज संस्थान यांना अर्पण केली.
श्रीराम नवमीच्या मुख्य पर्वावर श्री केशवराज यांची प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये अनेक राष्ट्रीय कीर्तनकार व प्रवचनकार यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केल्याचे दिसून येते, यामध्ये हरिभक्त परायण बाबुराव महाराज काळे रामायणाचार्य ताडशवनीकर यांचे किर्तन झाले ,हरिभक्त परायण प्रकाश महाराज जवंजाळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन झाले ,हरिभक्त परायण शंकर महाराज शास्त्री एम ए संस्कृत रामायणाचार्य रिसोड यांचे कीर्तन झाले, हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू यांचे कीर्तन झाले हरिभक्त परायण वाणीभूषण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे सुद्धा कीर्तन झाले हरिभक्त परायण विवेक महाराज केदार शास्त्री श्री क्षेत्र नाशिक यांचे सुद्धा कीर्तन झाले ,हरिभक्त परायण रमेश महाराज जायभाये श्री क्षेत्र वैष्णव गड यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. हरिभक्त परायण प्रेमानंदाजी महाराज देशमुख श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा यांचे काल्याचे किर्तन झाले या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक संत महंतां च्या पदस्पर्शाने श्रीक्षेत्र केशव शिवनी हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून याची ओळख झाली ,अनेक संत व महंतांनी या कार्यास आपली उपस्थिती लावली .यामध्ये महंत परमपूज्य परमहंस परिवृजकाचार्य श्री श्री १००८ स्वामी हरि चैतन्यानंद सरस्वती जी महाराज वेदांताचार्य एम ए.संस्कृत तत्त्वज्ञान कशी परमपूज्य महंत गुरुवर्य अनंतभूषित परमहंस परिव्रजकाचार्य आचार्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ स्वामी कृष्णा चैतन्य पुरी जी महाराज निळकंठेश्वर . परमपूज्य हरिभक्त परायण महंत श्री त्र्यंबक बुवा सानप गुरुजी नाना श्री क्षेत्र वैष्णव गड. परमपूज्य श्री श्री श्री महंत दत्तात्रेय महाराज दहिवाळ श्री दत्तपीठ देवस्थान लाडगाव, संभाजीनगर. महंत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज भांगशी माता गड छत्रपती संभाजी नगर. महंत परम पूज्य श्री १००८ स्वामी साधन चैतन्य जी महाराज श्री साखर तळे देवी संस्थान देऊळगाव कुंडपाळ. महंत परम पूज्य गुरुवर्य परम श्रद्धेय श्री भागवत गिरीजी महाराज अध्यक्ष रामगिरी महाराज ट्रस्ट श्रीक्षेत्र शंभू महादेव देवस्थान. महंत श्री ष. ब्र .सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज श्री जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी धर्मपीठ साखरखेडा॔ महंत गुरुवर्य श्री बालक गिरीजी महाराज अध्यक्ष सद्गुरु श्री सेवागिरीजी सेवा ट्रस्ट श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान. महंत परमपूज्य १००८ स्वामी अमोल आनंद जी महाराज सचिदानंद आश्रम सावत्रा.या संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये दिनांक ३ – ४ -२५रोजी श्री क्षेत्र केशव शिवनी येथे मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच कलशारोहण सोहळा या संत महंत मंडळींच्या पदस्पर्शाने संपन्न झाला. श्रीक्षेत्र नाशिक येथील ब्रह्मवृंदांच्या हस्ते दिनांक ०१-४ २५ वार मंगळवार ला दिपप्रज्वलन प्रायचित्त विधी गणेश पूजन पुण्याहवाचन पीठ देवता स्थापन अग्नी देवता स्थापन जलदिवास आरती दिनांक २ -४ २५ वार बुधवार श्री चे प्राप्त पूजन स्थापित देवता होम स्नपनविधी धान्य दिवस हवन आरती दिनांक ०३-४-२५ गुरुवारला देवता हवन न्यासविधी बलिदान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण पूर्णा हुती नैवद्य व महाआरती यज्ञाचार्य पंडित शिवहरी देशपांडे व ब्रह्मवृंद प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान श्री वसंतरावजी उदावंत श्री गणेश सीताराम शेरे पाटील व ग्रामस्थ यजमान श्रीक्षेत्र केशवशिवनी . तसेच केशव शिवणी येथील सरपंच माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष शिक्षण समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यास भरभरून प्रतिसाद दिला .या कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी वाहून घेतले.धार्मिक कार्यासाठी अनेक सामाजिक ,राजकीय ,अध्यात्मिक ,कला ,वाणिज्य ,वैद्यकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झाली. यामध्ये मातृतिर्थ सिंदखेड राजाचे नवनिर्माचित आमदार श्री मनोज जी कायंदे माजी आमदार तोतारामजी कायंदे माजी आमदार शशिकांत जी खेडेकर भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ . केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचे पुतणे योगेश भाऊ जाधव , तसेच तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे साहेब तसेच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री नरवडे साहेब श्री दुय्यम ठाणेदार मोहनजी गीते साहेब व अन्य पोलीस कर्मचारी सात दिवस सुरक्षेचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडले. वसमत येथील विपुल टेक्स्टाईल चे मालक उद्योजक गजाननराव जी महाले हरिभक्त परायण वाघ गुरुजी झोटिंगा, हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज उगले ,उगले पांगरी , हरिभक्त परायण शिवाजी महाराज मुंढे. हरिभक्त परायण आघाव महाराज पळसखेड चक्का. हभप सोपान महाराज खौड हभप सारंगधर महाराज टेके.गोपाल महाराज सानप.हभप अनील महाराज जाधव.
तसेच श्रीक्षेत्र वैष्णव गडाचे विश्वस्त हरिभक्त परायण जगन्नाथभाऊ जायभाये .हरिभक्त परायण पंढरी भाऊ घुगे ,हरिभक्त परायण सखारामजी बुरकुल हरिभक्त परायण रमेश गीते हरिभक्त परायण गोविंदरावजी देशमुख श्री वैभवजी देशमुख सर सामाजिक कार्यकर्ते श्री शंकररावजी उगलमुगले , प्रभाकरजी ताठे मामा सामाजिक कार्यकर्ते ,व प्राध्यापक दिलीपरावजी नायकवाड प्राध्यापक श्री नागरे सर दराडे सर,प्राध्यापक गजाननराव सोनवणे, अनेक पत्रकार बांधव हजर होते.श्री शिवाजीराव सानप गजानन रावजी बेंद्रे संभाजीनगर,प्रदीपजी नायकवाड डाॅ निकम साहेब,सहाने मामा, कैलासजी डोडिया , चाळसे मामा ,सरपंच गोपी टाले मलकापूर पांगरा सन्माननीय जुलालरावजी पाटील मलकापूर पांगरा पांडुरंगजी पाटील सोनवणे यादवराव टाले, भगवानरावजी गावंडे,संतोष भाऊ टाले, मुरकुट साहेब ,हरिभक्त परायण व्ही टी वायाळ साहेब ,पंचायत समितीचे सभापती विलासरावजी. देशमुख , सामाजिक कार्यकर्ते जुनेद अली, श्री गुलशेरखा पठाण, सामाजिक कार्यकर्ते बारस्कर साहेब, गट विस्तार अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा, दिलीपरावजी देशमुख रविभाऊ खंदारकर संदीपजी घिके मातोश्री बँकेचे अध्यक्ष श्री गायके साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी व अँड कमलाकर रावजी देशमुख.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उद्योजक श्री सुरेश आण्णा टाक (परळी )श्री रमेशराव धारासुरकर तसेच परळी येथील सामाजिक व अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील गणमान्य मंडळी उपस्थित होती. श्री सूर्यप्रकाशजी उदावंत नगरसेवक जालना, मिलिंदजी कपोते सराफ कोपरगाव,आशीष संगवई,डॉक्टर डी एस शिंदे साहेब ,डॉक्टर संदीप जी खराटे डॉक्टर सुनीलजी शेरे श्री नामदेवरावजी टेहरे सराफ बुलढाणा ,दिनेशजी बोकन सराफ सेलू ,श्री सुधाकर रावजी डहाळे पाथरी. माजी नगराध्यक्ष संतोष भाऊ खांडेभराड देऊळगाव राजा ,श्री जुमडे साहेब भूमि अभिलेख देऊळगाव राजा ,राजीव कायस्थ, निवृत्ती भाऊ वायाळ प्रवीणभाऊ देशमुख बाळासाहेब देशमुख . श्री कोंडुजी अडाने सराफ रिसोड श्री भगवानराव पवार ,संदीपजी मेरत.सुरेशराव कुलथे सरंबा . श्री डॉक्टर शिवानंदजी जायभाये, श्री संतोष शहाणे मंठा विनायक अंबिलवादे मंठा . प्रशांतजी कुलथे जालना ,श्री ज्ञानेश्वर कुलथे श्री प्रकाश बुऱ्हाडे फुलंब्री. अंबादास बुट्टे, मुकेश भैय्या,सरपंच विकास भाऊ आंधळे केशव शिवणी. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ श्रीक्षेत्र केशवशिवणी,येथील श्री केशवराज संस्थांचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ श्री क्षेत्र केशव शिवनी यांनी अथक परिश्रम घेतले,विशेष करून महाप्रसादासाठी सुलतानपूर, येथून वरुड येथून कारेगाव येथून ,म.पांग्रा येथून, बिबी येथील,वरवंड येथून, वरुडी येथील, अशा अनेक सेवेधारी महिला महाप्रसाद वाढपासाठी हजर होत्या हे विशेष. अनेक स्वयंसेवक हजार होते,
जवळपास दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून चार दगडी मंदिराचे काम पूर्ण केले.
दुपारी १२.३० ते २.३० यावेळी काल्याचे किर्तन झाले व तदनंतर महाप्रसादाचे आयोजक श्री वसंतराव नारायणराव उदावंत अध्यक्ष श्री केशवराव संस्थान श्री मुर्डेश्वर संस्थान केशव शिवनी यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.
राम नवमीच्या मुख्य पर्वावर राम जन्माच्या व काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली या उस्तवामध्ये अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी संत महंत व भाविक उपस्थित होते या उच्छवामधे संत महंतांचे
विविध महात्म्यांचे कीर्तन पार पडले रामनवमीच्या मुख्य पर्वावर राम जन्माच्या व काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली ,वारकरी संप्रदायातील अनेक संत महंत भाविक भक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंद घेfताना दिसले ,या भक्तिमय वातावरणाचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता श्री केशव राजाचे मनमोहक रूप पाहून अनेकांच्या भावमुद्रेतील आनंद ओसंडून वाहत होता.