आपला जिल्हामहाराष्ट्र
सीटीएमके गुजराती हायस्कूलचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

जालना प्रतिनिधी
दिनांक ४ मे २०२५ रोजी सीटीएमके गुजराती हायस्कूलमध्ये १०वीच्या बॅच २००८ चे स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला. तब्बल १७ वर्षांनी जवळपास ६०-६५ माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले.
कार्यक्रमात शाळेतील माजी शिक्षक – कुलकर्णी मॅडम, पाटील सर, येवते सर, साबणे सर, सावंत सर, कावळे सर, बनसोडे सर, शहा मॅडम आणि काळकुंबे सर – यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्नेहमेळाव्यात विविध खेळ, शिक्षकांसोबत गप्पा, केक कटिंग, आणि सामूहिक छायाचित्र अशा अनेक खास क्षणांनी सर्वांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.