25 वर्षानंतर झालेल्या 10 वी ब तुकडीचे स्नेहमिलन झाल्यावर शिक्षिका हेमलता काकडे यांचे अनुभव

जालना प्रतिनिधी
आपण कोणतेही काम मनापासून करत असताना एवढे काय काम करायचे कुठे तुमचा पुतळा उभा होणार आहे असे म्हणणारे खूप असतात. परंतु आपण मनापासून काम करतो याची पावती आपल्याला कधी ना कधी मिळतेच. नुकताच मी याचा अनुभव घेतला. श्री. म. स्था. जैन शाळेतील सन 2000 सालच्या बॅचने गेटटुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 25 वर्षापूर्वीची दहावीची बॅच. परंतु मागच्याच वर्षी आपण त्यांचा निरोप समारंभ केला आहे असं वाटलं. या निमित्ताने पेराल ते उगवते या म्हणीचा अनुभव आला. शिक्षक व विद्यार्थी यांचेही नाते किती अतूट असते याची प्रचिती आली. दहा-बारा तासांचा प्रवास केल्याचा थकवा कार्यक्रमातील आपुलकी पाहून निघून गेला. अलीकडे सर्व क्षेत्रात व्यावसायिक नाते सांभाळले जातात हे या विद्यार्थ्यांनी खोटे ठरवून दिले. शिक्षक व विद्यार्थी यांची नाते किती अतूट असते याचा अनुभव आला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री शांतीलाल वानगोता व शिक्षक श्री दिलीप शिंदे, श्री अरुण कासलीवार, श्री कांतीलाल कुंकुलोळ, श्री विलास जैन, श्री किशोरकुमार वाघ आणि शिक्षिका सौ.मंगला देशपांडे, सौ.तनुजा घोटांकर, सौ.कविता बरलोटा, सौ.सुमन जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, कार्यक्रमाचे सूत्रंचालन चैताली गहानकरी व आभार डॉ.अनुराधा आमटे यांनी केले. अमोल दब्बडवार, कीर्ती आसर, डॉ.अनुराधा भोसले, रोहिणी चौधरी, प्रज्ञा जगताप, तृप्ती कोडम, सुनील जाधव, विवेक काबरा, पुरुषोत्तम बोराटे, दिलीप राठोड, स्वप्निल संनंसे यांनी खुप परिश्रम घेतले व सर्वच विद्यार्थ्यांचा उत्साह अफाट होता.आपापल्या क्षेत्रात कोणी डॉक्टर कोणी प्राध्यापक , शिक्षक, उत्तम व्यवसायिक असल्याचे पाहून खूप अभिमान वाटला. सभागृहात प्रवेश करताच सुमधुर संगीतासह आदरपूर्वक आमची सर्वांची पाद्यपूजा केली गेली.व सन्मानाने सर्वांना मंचावर नेण्यात आले. विद्यार्थ्यांना आमच्यासाठी काय काय करावे असे झाले होते. स्वतःची मुले जशे प्रेमाने करतात तितक्याच प्रेमाने हे विद्यार्थी करत होते. त्यादिवशी आम्हाला राष्ट्रपतीपदक मिळाले असे वाटत होते हे मात्र नक्कीच.
जो हिरे की कदर करता है उसे शाह कहते हैं, जो हिरे की कदर करता है उसे शाह कहते हैं और जो कला की कदर करता है उसे बादशाह कहते हैं l अशा सर्व बादशहांचे मनःपुर्वक आभार. शिक्षकी पेशा सुद्धा एक कला आहे. या कलेचा तुम्ही सर्वांनी जो सन्मान केला त्या बद्द्ल तुम्हा सर्व टीम चे कौतुक.
दिलीप शिंदे यांचे मनोगत
कसे आहात रे सगळे ? तुम्ही दाखवलेल्या आपुलकी नम्रता जिव्हाळा आग्रह आदर ‘ कृतज्ञता या सर्वांची अनुभूती घेऊन खरोखर भारावून गेले !शिक्षकी पेशाची व प्रामाणिक पणे केलेल्या कार्याची पावती मिळून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले अगदी ! तुझ्या प्रेमळहट्टामुळे कार्यक्रमास आल्याने आयुष्य वाढल्याचे समाधान लाभले तुमचे संयोजन ‘ सुग्रास भोजन ‘ प्रेमळ आग्रह ‘ स्मृतींना दिलेला उजाळा . तुमचे करीयर सुखी संसार सर्व डोळ्यांनी पाहून व भेटून अगदी भरून पावले ! या सर्व यशाचे श्रेय विशेषतः तुझे कुटुंब व टीमला दिलेच पाहिजे प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी करून गप्पा मारण्यास वेळ कमी पडल्याची हुरहूर घेऊनच मनाने प्रसन्न होऊन परतले खरोखर संस्मरणीय व कौटुंबिक असे स्नेहमीलन झाले ! सर्वांना पुनश्च एकवार मनःपूर्वक आशीर्वाद व भावी उत्कर्षासाठी शुभेच्छा सांग नक्की।
मंगला देशपांडे यांचे मनोगत