आषाढीनिमित्त गोल्डन किड्स स्कूलची ग्रंथदिंडी, वारीच्या पाऊलखुणा, संस्कृतीचे शिकवण. ज्ञानदिंडीतून संस्काराचे दर्शन

जालना प्रतिनिधी
सहकार बँक कॉलनी येथील गोल्डन किड्स प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उत्साह असून यामध्ये सरकारपासून ते सामान्य माणूसही सहभागी होतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य दिंडी पंढरपूरकडे जातात या वारीचे अनुभव चिमुकल्या मुलांना देण्यासाठी आणि आधुनिक व डिजिटल जगात पुस्तके वाचण्याकडे सर्वांचे झालेले दुर्लक्ष लक्षात आणून देऊन पुस्तक वाचायचे संदेश इतरांना देण्यासाठी या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये गोल्डन किड्स चे विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशात परिधान करून मृदुंग व टाळ्याच्या गजरात दिंडी काढली काही मुलांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशात दिंडीत सहभाग नोंदवला परिसरातील नागरिकांनीही फुगडी खेळून चिमुकल्या मुलांना प्रोत्साहन दिले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजून सांगण्यात आले या ग्रंथदिंडीत ग्रंथ व पुस्तके ठेवले पालखी सर्वांचे आकर्षक ठरली महत्त्वाचे म्हणजे पुस्तक वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे हा संदेश देण्यामध्ये शाळेने काढलेली ही दिंडी यशस्वी ठरली यावेळी संस्था चालक दुर्गा सचिन मुंडे व सहशिक्षिका सीमा सुहास मुंडे अमृता देशपांडे स्वाती बिदरकर स्वाती सांगोळे यांनी परिश्रम घेतले