दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार ; दिल्लीतील गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बैठकीत ठरला निर्णय ; औपचारिक घोषणा बाकी ; भाजपाच्या नेता निवडीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याची अधिकृत घोषणा होणार
महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर संपन्न होणार ;
शपथविधी 5 डिसेंबरला, तर मग तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर? सुषमा अंधारेंचा सवाल, शिवसेना शिंदे गटावरही केली टीका
महायुतीची आज होणारी बैठक अचानक रद्द, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी दरेगावाकडे रवाना , महायुतीत घडामोडींना वेग ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वर्षा निवासस्थानी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड ; चर्चांना उधाण ; एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं, संजय राऊतांची टीका
महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याची उत्सुकता ; एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, आमदार शंभूराज देसाईंचं वक्तव्य ; श्वेताताई महाले, देवयानी फरांदे ,राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे , या नविन चेहऱ्यासह महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेकांच्या नावांची चर्चा
राज्यात भाजपचे सरकार, त्यामुळं अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला ;भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
वक्फ बोर्डाच्या निधीवरुन गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटींचा निधी जाहीर, मात्र नंतर जीआर मागे ; काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार ; देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा ; भाजपचा आक्रमक पवित्रा, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा आदेश तात्काळ रद्द
काँग्रेस अनेक जिल्ह्यातून हद्दपार! इतकी दयनीय अवस्था का झाली? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आकडेवारीसह मांडला काँग्रेसच्या पराभवाचा इतिहास ; एका दिवसात 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे पुरावे द्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र ; संघाच्या इशाऱ्यावरच नाना पटोलेंचे काम; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा घाणघात, पक्षातून बडतर्फ करण्याचीही मागणी
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर
विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड; कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात ; हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, आमदार कैलास पाटलांची धाराशिवमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर धडक, म्हणाले,खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा ; तीन एकर मुरमाड जमिनीतही तब्बल 360 टन उसाचे विक्रमी उत्पादन; कोल्हापूरच्या आधुनिक शेतकऱ्यांची अनोखी यशोगाथा
त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची त्सुनामी, एकाच षटकात 28 धावांचा पाऊस, 11.2 षटकांतच बडोद्यानं गाठलं 109 धावांचं लक्ष ; फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता, दुबईत आयसीसीच्या सर्व बोर्ड सदस्यांसोबत बैठक सुरु
गोंदिया जिल्ह्यातील अंजली तालुक्यात सडक दुर्घटना ; शिवशाही बस उलटून भिषण अपघात ; दहा जणांचा मृत्यू ; शिवशाही बसच्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा