जालना जिल्हाधिकारी म्हणुन आशिमा मित्तल यांनी स्विकारला पदभार

जालना जिल्हा प्रतिनिधी
जालना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या श्रीमती आशिमा मित्तल यांनी शुक्रवार दि.1 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला.
त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणुन काम करत असतानी श्रीमती मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आयआयटी मुंबई येथून बी.टेक. सिव्हिल इंजिनियरींग केली असुन यामध्ये त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी या क्षेत्रातही काम केले आहे. तसेच त्यांचे मानववंशशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. श्रीमती मित्तल यांनी सन 2017 ची भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली असून त्या देशात 12 व्या स्थानी होत्या. 2018 साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात रुजू झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी म्हणुन काम केले आहे. तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणुन कामकाज पाहिले आहे.