आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन
आषाढीनिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय स्कूल ने संस्कृतीचे शिकवण दिले.

जालना प्रतिनिधी
आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उत्साह असून यामध्ये सरकारपासून ते सामान्य माणूसही सहभागी होतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य दिंडी पंढरपूरकडे जातात या वारीचे अनुभव चिमुकल्या मुलांना देण्यासाठी आणि आधुनिक व डिजिटल जगात मोबाईल पासून दूर राहून नाचून खेळून हसतमुख व विठ्ठलाच्या नामा मधे गुंग होऊन आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशात परिधान करून मृदुंग व टाळ्याच्या गजरात दिंडी काढली काही मुलांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशात दिंडीत सहभाग नोंदवला यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजून सांगण्यात आले