जालन्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली

जालना प्रतिनिधी
जालन्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्याच्या अपर मुख्य सचिव( सेवा) व्ही. राधा यांनी या बदलीचे आदेश आज दिनांक 30 रोजी काढले आहेत. दरम्यान जालन्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना मात्र अद्याप पर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही. श्रीमती अशिमा मित्तल या जालन्यात जिल्हाधिकारी म्हणून येत असल्यामुळे जालन्यात आता पुन्हा महिलाराज सुरू होणार आहे. कारण याच महिन्यात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती मिन्नू या रुजू झाल्या आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आता जिल्हाधिकारी म्हणून देखील महिलाच येत आहेत. तसेच अपर जिल्हाधिकारी म्हणून देखील रिता मैत्रेवार या कार्यरत आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्याचा कारभार हा महिला अधिकाऱ्यांच्या हातीच जाणार आहे. मूळच्या राजस्थानच्या जयपूर मधील अशिमा मित्तल आहेत. लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परीक्षेमध्ये तिसऱ्या प्रयत्नात श्रीमती मित्तल यांना यश मिळालं. त्यांनी काही दिवस सिव्हिल इंजिनिअर म्हणून देखील काम केलेले आहे 2018 मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत(IAS) रुजू झाल्या. मानव वंशशास्त्रात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. तूर्तास एवढेच अधिक माहिती श्रीमती अशीमा मित्तल हजर झाल्यानंतर.