आपला जिल्हा
“एकात्म मानव दर्शन पंडित दीनदयाळ उपाध्याय”मुक्तेश्वर संस्थान पंडित दीनदयाल उपाध्याय प्री-प्राइमरी इंग्लिश स्कूल जालना.

जालना प्रतिनिधी
“एकात्म मानव दर्शन पंडित दीनदयाळ उपाध्याय”मुक्तेश्वर संस्थान पंडित दीनदयाल उपाध्याय प्री-प्राइमरी इंग्लिश स्कूल जालना.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार केवळ एखाद्या राजकीय पक्षापुरते सीमित नव्हते, तर संपूर्ण मानवतेसाठी कल्याणाचे मंत्र होते. ‘इंटिग्रल ह्युमिनिझम’ अर्थात एकात्म मानव दर्शन हे त्यांच्या दर्शनाचे शीर्षक आहे. वैश्विक एकता, सर्जनात्मकता आणि सहकार हाच विकासाचा मार्ग आहे, संघर्ष किंवा संहार नाही, हे सौम्य स्वरात आपल्याला दीनदयाळजी या दर्शनातून समजावतात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 25 सप्टेंबर रोजी जयंती ह्या शाळेत साजरी करण्यात आली व त्यात मुलांना दिनदयाल् यांच्या बद्दल माहिती देण्यात आली .त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला उजाळा देणारा एक छोटासा लेख.