पोवाडा, देशभक्तिपर गीते, गवळण इत्यादी स्पर्धांनी साजरी झाली संस्कार प्रबोधिनी विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती

जालना प्रतिनिधी
जुना जालना येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पोवाडा, देशभक्तीपर गीत व गवळण यांच्या स्पर्धांनी वर्ग पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर विविध प्रकारे प्रकाश टाकला. अवघ्या दीड दिवसाच्या शाळेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व रशिया येथे जाऊन केले. तसेच भारतात देखील त्यांनी विविध कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या यांचे माध्यमातून जनजागृती केली आणि सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम केले, अण्णा भाऊ साठे यांनी फकीरा या कादंबरी मधून आपल्या समाजाचे खरे चित्र मांडले, त्यांनी शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे रचले त्यामुळे त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.
त्यांच्या शाहिरीमध्ये त्यांनी लावणी, पोवाडे, लोकनाट्य, गीते यांचा समावेश केला. अण्णाभाऊचे जीवन अतिशय दुःखी, कष्टाळू, उपेक्षा, अपमान यांनी व्यापलेले असले तरी त्यांनी आपल्या साहित्यावर त्याचा प्रभाव पडू दिला नाही ही अण्णाभाऊंची खासियत होती. अशा प्रकारची सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या ज्ञानात भर घातली. या जयंती साठी शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.