ताज्या घडामोडी

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर

 शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा ; भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी ‘भावांतर’ योजना 

प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा ; लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआकडून नवी योजना 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला ; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही विचारले प्रश्न! 

ओबीसी आणि दलितांचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा मविआचा घाट; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा गंभीर आरोप ; ज्यांना चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना जवळ घेऊन बसलात, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल  

 खासदार धनंजय महाडिकांच्या अडचणी वाढल्या! लाडक्या बहिणींबाबत केलेल्या विधानावरून निवडणूक आयोगाने धाडली नोटीस ; लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, लाडकी बहीणच तुम्हाला धडा शिकवेल, आमदार बच्चू कडूंचा धनंजय महाडिक यांच्यावर प्रहार ; लाडकी बहीण योजनेवरुन असे बोलणे चुकीचे, धनंजय महाडिक यांच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे परखड मत 

पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन… आमदार सुनील टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस ; सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंच्या टिकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर  

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

मी संधीसाधू तर शरद पवार कोण हे त्यांना सांगावंच लागले, शरद पवारांच्या टीकेला भाजप खासदार अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर ; ‘अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी’, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण 

आधी सोबत प्रचार, मग ओळख अन् सिक्रेट मिटिंग; अपहरण करून विवस्त्र महिलेसोबत फोटो अन् 10 कोटींची केली मागणी, शिरुरचे आमदार अशोक पवारांच्या मुलाने सांगितली हकीकत 

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील विक्रोळीत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, गोदामात नेण्यात येत असल्याची माहिती; पोलिसांकडून तपास सुरू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज! सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज ; भारतविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी केली संघाची घोषणा!

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!