ताज्या घडामोडी

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या 

मोहन चौकेकर

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 5 कोटी घेऊन विरार पुर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील निवांत हॉटेलमध्ये आले होते असा बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचा आरोप, यावेळी दोन डायऱ्या सापडल्याचा देखील हितेंद्र ठाकूर यांचा आरोप,भाजप नेत्यांनीच विनोद तावडेंबाबत टीप दिली, हितेंद्र ठाकूर यांचा दावा ; विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांच्या टीप मिळाल्याच्या दाव्याला संजय राऊतांचा दुजोरा, भविष्यात तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान, संजय राऊतांचा गंभीर आरोप ; 40 वर्ष राजकारणात आहे,कधीही पैसे वाटले नाहीत, विनोद तावडेंची प्रतिक्रिया

विरारमधील पैसे वाटपाचा आरोप, हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीनंतर विनोद तावडे,राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल ; विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर आतापर्यंत सरकारं कशी पाडली अन् बनवली त्याचा हा पुरावा, भाजपचा नोट जिहाद समोर, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल ; विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा,काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांची मागणी, जनतेचे पैसे लुटून टेम्पो कुणाकडे निघालेला,राहुल गांधी यांचा विनोद तावडे प्रकरणी थेट नरेंद्र मोदींना सवाल

पाच कोटी आले कोठून? भाजपच्या ओरिजनल लोकांकडून अशी कृती घडणं धक्कादायक, सुप्रिया सुळे यांचीही विनोद तावडे प्रकरणी टीका ; विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट,जनता धडा शिकवणार, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल ; विरारमध्ये विनोद तावडेंचा ड्रामा सुरु असताना भाजपने डहाणूत डाव साधला, बविआच्या सुरेश पडवींचा पक्षप्रवेश

बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! शरयू मोटर्सवर पोलिसांचा छापा, निवडणुकीच्या काळात अशा घडत असतात, श्रीनिवास पवार यांची भूमिका समोर ; रात्री 10-12 शरयू मोटर्समध्ये पोलिसांची तुकडी धडकली पण अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, युगेंद्र पवारांची छाप्यानंतर पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं,आमचा रंग भगवाच,अजित पवार यांनाही भगवे करु,देवेंद्र फडणवीस यांचं एका मुलाखतीत भाष्य

तुमची किती मते? हे घ्या 4 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक व्हिडीओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून पोस्ट, निवडणूक आयोगाकडे तक्रार ; मतदानकार्ड जमा केले,बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले, संभाजीनगर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील प्रकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

मुंबई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनसवर प्रवाशाकडे सापडले तब्बल 42 लाख,ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून पलायन करण्यापूर्वी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ; टीव्हीवरील मालिकांमधून छुप्या प्रचार, काँग्रेसची तक्रार,निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नोटीस, 24 तासांत खुलासा करण्याचे आदेश

आपलं हिंदुत्व समजल्यानंतर मुस्लिम आपल्यासोबत,कुणालाच माऱ्यामाऱ्या नकोय,दंगे नकोयेत,किती काळ हे करत राहायचं,उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

बाबा सिद्दिकींप्रमाणं हत्या करण्याची धमकी, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची तीन जणांविरोधात तक्रार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्मा संघाबाहेर, हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!