विविध जाती धर्म आणि पंथांच्या नागरिकांना भारतीय संविधानाने एक संध ठेवले – प्रा. श्रीकांत चिंचखेडकर सरांचे अल्पसंख्यांक दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन
अल्पसंख्यांक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची श्रीकांत सरांकडून माहिती"

संपादक- गौरव बुट्टे जालना
अल्पसंख्यांक दिनानिमित्त जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार मॅडम यांच्या अध्यक्षतेमध्ये प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी प्रमुख व्यक्ता म्हणून आपले विचार मांडले .भारत देश विविधतेने नटलेला आहे देशातील विविध जाती धर्म पंथाच्या नागरिकांना भारतीय संविधानाने एक संघ ठेवले आहे. केंद्रासह राज्य शासनाने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी व त्यातून त्यांची उन्नती साधण्यासाठी विविध योजनेचा उपयोग होत आहे .अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी केंद्रासह राज्य शासनाच्या विविध योजना सुरू असून या योजनांची माहिती व त्यांचा लाभ कसा घ्यावा यांची प्रतिपादन प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होती यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार , जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अल्पसंख्यांक समुदायातील विविध संघटना, संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पुढे प्रा. चिंचखेडकर म्हणाले की अल्पसंख्याक समुदायातील महिलांनी सक्षम होणे गरजेचे असल्याने शासनाकडून समुदायाच्या महिलांसाठी विविध विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याद्वारे महिलांनी आपली उन्नती साधून समाजाचा व राष्ट्राचा विकास केला पाहिजे त्यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात राबविण्यात येणाऱ्या केंद्रासह राज्य शासनाच्या विविध योजनांवर प्रकाशही टाकला.
“” याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी रीता मित्रवार म्हणाल्या की अल्पसंख्यांक समुदायातील घटकांना पुढे आणण्यासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी देशात 18 डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो शासनाच्या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ घेऊन अल्पसंख्याकांनी आपली प्रगती साधावी असे सांगून अल्पसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधीच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या व त्यांना समाधानकारक उत्तरे दिली कार्यक्रमास उपस्थित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची व अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींची उपस्थिती उल्लेखनीय होती”: