भारतीय कृषी संशोधन संस्थाच्यावतीने 2 डिसेंबर रोजी डॉ. प्रशांत तेलगड यांचा सन्मान

जालना (प्रतिनिधी):
भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा व कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ग्लोबल फार्मर्स बिझनेस नेटवर्क व इंडियन कौन्सिल ऑफ आग्रिकल्चरल रिसर्च फेअर ग्राउंड पुसा नवी दिल्ली येथे हा सन्मान सोहळा होणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या सहकार्याने कृषी जागरण द्वारे आयोजित, MFOI पुरस्कार सेवा देतात. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून. ICAR सोबतची ही भागीदारी कार्यक्रमाचे महत्त्व वाढवते. कृषी नवकल्पना, उत्कृष्टता आणि आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे समर्पण दर्शवित हे राष्ट्रीय स्तरावर समिट 2024 मध्ये मुख्य ध्येय आहे . यामध्ये शाश्वत शेती व सेंद्रिय शेतीवर आधारित उत्पादक उद्योगाच्या शक्यता आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका या विषयावर कामगिरी केल्याबद्दल जालना येथील आयोनेक्स केमिकल्स संचालक चे डॉ. प्रशांत तेलगड यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या 2 डिसेंबर 2024 रोजी ICAR दिल्ली व कृषी जागरण द्वारे आयोजित MFOI सौहळा कार्यक्रमात डॉ. प्रशांत तेलगड यांना MFOI पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात देशातील जगभरातील शास्त्रज्ञ,प्रगतीशील शेतकरी, जगभरातील लोकप्रतिनिधी, विविध कंपन्यांचे सीईओ उपस्थित राहणार आहेत. डॉ प्रशांत तेलगड यांचा राष्ट्रीयस्तर सन्मानाबद्दल प्रा.डॉ रामदास निहाळ, डॉ राहुल वाहटूळे, प्रा डॉ प्रताप रामपुरे, प्रा डॉ दिलीप सपाटे, प्रा वडजे , निवृत्ती मावस्कर, सर्जेराव थोरात, सुरेश गोरे, संतोष भुतेकर आदींनी अभिनंदन केले आहे.