ताज्या घडामोडी
बी. पी उगले शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जालना प्रतिनिधी
आज दिनांक 3/ 01/ 25 रोजी बी. पी. उगले इंग्लिश स्कूल, समर्थ नगर,जालना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य केशव फिस्के यांनी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. शाळेतील सातवीच्या विद्यार्थिनींनी एक नृत्य सादर केले तसेच भाषणे पण केली. प्रिप्रायमरी विभागातील काही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आल्या होत्या. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी सर्वेश याने महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा करून भाषण दिले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन चव्हाण याने केले.तसेच कार्यक्रमाची सांगता प्राचार्य.केशव फिस्के यांच्या मार्गदर्शनाने झाली.