भाजपच्या जालना महानगर जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष पदी सतीश जाधव यांची निवड.

विनोद कोल्हे कार्यकारी संपादक
भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा कार्यकाऱी अध्यक्ष पदी सतीश सुरेशराव जाधव यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या शिफारशी वरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी श्री. सतीश जाधव यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्या आतापर्यंतच्या पक्ष कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने आपणास जालना महानगर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. आपण वेळोवेळी होणाऱ्या बैठक तसेच कार्यक्रमाना उपस्थित रहावे व संघटन वाढीसाठी आपले योगदान द्यावे असे म्हंटले आहे. यावेळी आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, रामेश्वर भानदरगे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे आदीनी या निवडीचे अभिनंदन केले आहे.