ताज्या घडामोडी

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची हत्या नाही, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानियांचा दावा फोल; दारुच्या नशेत एकाने व्हॉइस मेसेज पाठवला, बीड पोलिसांचा खुलासा ; संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याला फोन गेले, हा बडा नेता कोण? अंजली दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरुच; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दिला दाखला ; संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल, तपासाची चक्रे फिरवली

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात , वाल्मिक कराडसह चार आरोपींची बँक खाती सिल ; 20 दिवस उजाडले तरी ठोस कारवाई नाहीच ; बीडमधील सर्वपक्षीय मोर्चानंतर संतोष देशमुखांसाठी परभणीतही 4 जानेवारी रोजी मूक मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर ; तुळजापूरच्या सरपंचांवरील जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट, गावामध्ये आंदोलन, घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या गाडीला आंदोलकांचा दे धक्का

आमदार सुरेश धस यांनी नाव घेतल्याने अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट , आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची व सुरेश धसांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचित कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन ; प्रवास विकृतीकडे सुरू झाला, प्राजक्ता माळी साठी सिनेसृष्टीतून प्रतिक्रिया; सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर राजकारण्यांवर व्यक्त केला तीव्र संताप

जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक ; बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे, गुन्हेगारीची खळबळजनक आकडेवारी समोर

नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना माजी मंत्री छगन भुजबळांचे पत्र ; मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही 18 मंत्र्यांनी मंत्री पदाचा पदभार अजूनही स्वीकारला नाही!

बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाचा अत्याचार, मैत्रिणीने बिअर पाजली; अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालकाला बेड्या ; चालत्या रिक्षात धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकले, नागपूरच्या हत्येने राज्य हादरले ; रुग्णांच्या बेडवर उंदरांच्या उड्या, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, प्रवास होणार हायस्पीड; सिडकोचा मोठा निर्णय ;नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष

या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप ; बिहारमध्ये एका झटक्यात 62 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत मुख्यमंत्री नितीश कुमार थेट दिल्लीत! भाजप आणि जेडीयूत तणावाची चर्चा

अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूकही विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला ; छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर

बॉक्सिंग डे कसोटी रोमांचक वळणावर, भारताला मेलबर्नवर कसोटी जिंकण्याची संधी; ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 333 धावांची आघाडी, कांगारू पाचव्या दिवशी भारताला थेट फलंदाजी देणार का? याची उत्सुकता ; पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!