ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर

                                                                            पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर 17 वा पुरस्कार; नायजेरिया कडुन ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार

सगळ्यांचा नाद करा, पण शरद पवारांचा नाही; साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे; शरद पवारांचा टेंभूर्णीतील सभेत एल्गार ; ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल ; मी साहेबांना सोडलं नाही, सर्व आमदारांची सरकारमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यामुळे निर्णय घेतला, अजितदादा पवारांचा मोठा दावा 

 ‘मी चोरी करायला आलीये का?’ बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर नात रेवतीसह अडवल्यावर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांचा संताप, अर्धा तास ताटकळत ठेवल्यानंतर दोघींना आत सोडले ; ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता; सुप्रिया सुळेही भडकल्या ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताईं पवारांच्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांना अडवल्यामुळे सोशल मीडियावर अजितदादा पवारांवर अनेकांची टीका

 मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फाॅर्म्युला ठरलेला नाही, सरकार बहुमताने आणण्यासाठी आमची प्राथमिकता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे वक्तव्य; माहीमवरुन राज ठाकरेंसोबत थोडा दुरावा निर्माण झाला, दोघांनाही दोघांचा पक्ष जपायचा आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण 

महाराष्ट्र गुजरात आणि अदानीच्या चरणी वाहणार्‍या बुटचाट्यांच्या हाती देणार का? पाटणच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात ; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका ; मुस्लीम समाजानं वंचितला मतदान करावं, पैगंबर बील आणू, 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणार, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधी यांचें ट्विट; बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन ; काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, राहुल जगताप आणि माजी आमदार राजू तिमांडे यांचं पक्षातून निलंबन  

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री, त्यांच्या वक्तव्याला कोणीही बळी पडणार नाही, खासदार प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला ; आमच्या गरिबांची पान टपरी बरी, मात्र महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही; परिवर्तन महाशक्तीच्या बच्चू कडू यांचा विश्वास 

 ‘घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, जाहिरातीमधील ठरविक भाग काढण्याचे निर्देश ; अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट; आमदार सदा सरवणकरांचा ‘राजपुत्रा’वर बोचरा वार

मणिपूरमध्ये 3 महिला आणि 3 मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला, 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ; मणिपूर पुन्हा पेटताच अमित शाहांनी महाराष्ट्र दौरा केला तडकाफडकी रद्द, तातडीने दिल्ली गाठली 

  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले  

 रोहित शर्मा पर्थ कसोटीतून बाहेर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार, 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार पहिला कसोटी सामना

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!