जीवनराव पारे विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .

कार्यकारी संपदाक : विनोद कोल्हे
जीवनराव पारे विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला दि. 06डिसेंबर 2024 रोजी जीवनराव पारे विद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरी करण्यात आला . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेतील सहशिक्षक माधव भद्रे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थी कु. श्रेया भुक्तर , कु. दिव्या सरोदे, कु.हर्षाली खिल्लारे, कु. मयुरी खरात, कु.गौरी क्षीरसागर,कु. खुशी कुऱ्हे व प्रेम जाधव, ऋषभ भालेराव, प्रतीक वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कु.आरती आदमाने, कु पल्लवी आदमाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीतगायन केले.यानंतर शाळेचे सहशिक्षक नारायण राजेंभोसले यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कर्तव्यविषयी माहिती सांगितली.तसेच शाळेचे मुख्यध्यापक सुभाष पारे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु आरती आदमाने व पल्लवी आदमाने यांनी केले.