माजी प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांचे निधन

जालना येथील जे. ई . एस. महाविद्यालय चे माजी प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी 11 वाजता दुःखद निधन झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
मराठवाड्यातील नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सोळा वर्षे त्यांनी कार्य केले … विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरही त्यांनी कार्य केले … एक समजूतदार आणि प्रश्न सोडविणारे प्राचार्य म्हणून त्यांची ओळख होती… भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असतानाही त्यांनी इतरही विषयांत त्यांनी रस दाखवून महाविद्यालयास सतत गुणवत्तेच्या शिखरावर ठेवले … गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणांचा उचित उपयोग करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता… विद्यार्थ्याच्या विविध गुणांना वाव मिळावा म्हणून ते सतत प्रयत्नशील रहात असत …
समाजाभिमुख , शिक्षण प्रेमी , विद्यार्थी प्रिय शिक्षक, प्राचार्य राहिलेले व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याची उणीव मात्र कायमराहील … त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली