संभाजी ब्रिगेड पक्ष प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन

जालना ( प्रतिनिधी)
जालना विधानसभा मतदार संघातील संभाजी ब्रिगेड पक्षाचे उमेदवार विभागीय उपाध्यक्ष विजय वाढेकर यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे शुक्रवारी ( ता. 08) जूना जालना भागातील उढाण हाॅस्पीटल समोर आबड कॉम्प्लेक्स येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे पाटील यांच्या हस्ते जल्लोषात उद्दघाटन करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा.डाॅ.सूदर्शन तारख, जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश उपाध्यक्षा विभावरीताई ताकट, मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव प्रा.डाॅ.गजानन देशमूख,
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड, संभाजी ब्रिगेड महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा
दीपालीताई दाभाडे, शहराध्यक्षा सूवर्णाताई राऊत, शहराध्यक्ष आशिष अग्रवाल,दत्तात्रय कपाळे, संतोष चाळसे,ज्ञानदेव जगताप,शेख नासेर,जगन्नाथ काळे,वैशालीताई घूले,निर्मलाताई पडोळ,बाळासाहेब खवने,ज्ञानेश्वर ताकट, शिवाजी वाढेकर,सय्यद बिलाल,संतोष कांबळे,शेख बाबू,यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.