शंभर शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांचा सत्कार.

जालना प्रतिनिधी
100 शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण व विशेष कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा व शाळांचा गौरव व सत्कार दरवर्षी करण्यात येतो. याही वर्षी क्लब तर्फे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात आपल्या जालन्यातील प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांचा त्यांनी केलेल्या शैक्षणिक , सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शंभर शिक्षक क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांप्रती असणारी त्यांची तळमळ व विद्यार्थ्यांप्रती राबवत असलेले नाविन्यपूर्ण विविध उपक्रम यांचा माननीय श्री आर आर जोशी सर यांनी विशेष उल्लेख केला. याबद्दल श्रीकांत सरांनी आर आर जोशी सर व शंभर शिक्षक क्लब यांचे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती मंगला धुपे (शिक्षणाधिकारी माध्यमिक), जालना मनपा आयुक्त श्री संतोषजी खांडेकर, उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, , सुप्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर विशाल तायडे तसेच डॉक्टर ज्योती धर्माधिकारी, सुभाष भालेराव, डॉ. वानखेडे, डॉ. बळीराम बागल, डॉ. पद्माकर सबनीस, डॉ. प्रदीप हुसे, इंजिनिअर एस एन कुलकर्णी , श्री एम. जी. जोशी सर याचबरोबर 100 शिक्षक क्लबचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, निवड समितीचे अध्यक्ष आर आर जोशी सर, इंगोले सर व इतर उपस्थित होते. या सत्कार समारंभानिमित्त प्रा. श्रीकांत चिंचखेडकर सरांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना या समूहाचे काम खरच वाखाणण्याजोगे आहे. शिक्षकांकडून कुठलाही अर्ज न मागवता समाजा मधील विशेष काम करणाऱ्या शिक्षकांची आपल्या चाणाक्ष नजरेने माहिती गोळा करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे काम हा समूह करतो. त्याच बरोबर शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये राबवत असलेले क्लबचे उपक्रम कौतुकास्पद आहे त्यामुळे आमच्यासारख्यांना आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. 100 शिक्षक क्लबच्या कामाचे कौतुक प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी बोलताना केले आणि शंभर शिक्षक क्लबचे आभार मानले.