महाराष्ट्र

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या 

मोहन चौकेकर

 राज्यातील मतदारांचा महायुतीला स्पष्ट कौल, महायुतीने तब्बल 234 जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव, फक्त महाविकास आघाडी 49 जागांवर विजयी 

 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची 57 जागांवर आघाडी, 2014 आणि 2019 च्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश, भाजप यंदा 135 पार; राज्यात पवार पॅटर्न फेल, शरद पवारांनी राज्य पिंजून काढले पण तुतारी वाजलीच नाही, राज्यात शरद पवारांना फक्त 14 जागांवर आघाडी 

 उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 94 शिलेदारांपैकी 16 जणांचा विजय ; महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, कोणत्या रागापोटी ही लाट उसळली हे समजत नाही, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

 बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूरांसह काँग्रेसचे बडे चेहरे पराभूत, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील अनेक नेत्यांना धक्का, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निसटता विजय

 राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 25 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार शपथविधी ; महायुतीचा मुख्यमंत्री कोण बनणार याची उत्सुकता शिगेला, जास्त जागा हा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट ; मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाचा दावा, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्याने यश मिळाल्याचा प्रवक्ते राजू वाघमारेंचा दावा 

 आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत ; पराभव मान्य करावा लागेल, महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर मतदारांनी मतदान केलं की ईव्हीएमनं, आदित्य ठाकरेंचा सवाल 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा माहीममधून दारुण पराभव, शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी मारली बाजी ; माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य, मनसेच्या उमेदवारांच्या पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

 हा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ; लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया 

 अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला, बारामतीमधून युगेंद्र पवारांचा 1 लाख 16 हजार मतांनी पराभव ; समान नाव आणि ट्रम्पेट चिन्हाने पवारांच्या देवदत्त निकमांचा पराभव, ‘गद्दार’ म्हणालेले दिलीप वळसे पाटील आंबेगावातून 1100 मतांनी विजयी 

 कोकणात राणे बंधुंचा विजय, ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंना तब्बल 53,000 मताधिक्य ; कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार; शरद पवार गटाच्या समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव 

उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास स्वागत, भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, उद्धव ठाकरे भाजपचे नैसर्गिक मित्र असल्याचा पाटलांचा दावा 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!