ताज्या घडामोडी

कार्तिकी सोहळ्याला नांदेड विभागातून ३ विशेष रेल्वे धावणार 

मोहन चौकेकर

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने आदिलाबाद ते पंढरपूर आणि नांदेड ते पंढरपूर, बिदर-पंढरपुर अशा अनारक्षित ३ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे जाहीर केल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे .

आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी एकादशीला मराठवाड्यासह आदिलाबाद, बिदर भागातून पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. येत्या १२ तारखेला कार्तिकी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणा-या रेल्वे गाड्यांना भाविक तसेच वारक-यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दमरेच्या नांदेड विभागातील नांदेड, अदीलाबाद, बिदर येथून ३ अनारक्षित विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.

त्यात ०७५०१ आदिलाबाद ते पंढरपूर ही गाडी आदिलाबाद येथून दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुटेल किनवट, भोकर, मुदखेड, हुजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी परळी, लातूर रोड, उस्मानाबाद,बार्शी टाऊन, कुडूर्वाडी मार्गे पंढरपूर येथे दुस-या दिवशी सकाळी ७.३० वाजता पोहोचेल. गाडी क्र.०७५०२ पंढरपूर-आदिलाबाद ही गाडी गाडी पंढरपूर येथून दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सुटेल कुडूर्वाडी, उस्मानाबाद, लातूर रोड, परळी, मुदखेड मार्गे आदिलाबाद येथे दुुस-या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०७५३१ पंढरपूर-नांदेड अनारक्षित विशेष गाडी पंढरपूर येथून दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता सुटेल आणि कुडूर्वाडी, उस्मानाबाद, लातूर, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा मार्गे नांदेड येथे रात्री १०.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७५३२ नांदेड ते पंढरपूर ही गाडी हजुर साहिब नांदेड येथून दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, उस्मानाबाद, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे दुस-या दिवशी ७.३० वाजता पोहोचेल.

०७५१७ बिदर-पंढरपूर गाडी बिदर येथून दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल भालकी, उदगीर, लातूर रोड, उस्मानाबाद, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे दुस-या दिवशी स. ६.२० वाजता पोहोचेल. तर ही गाडी पंढरपूर येथून दि.१२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच बिदर येथे दुस-या दिवशी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. पंढरपूर येथे कार्तिकी सोहळ्यास जाणा-या भाविकांनी या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. आहे.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!