दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती, शिंदेंना राज्य आणि केंद्रात झुकतं माप देणार ; एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामापत्र सोपवलं, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबारी पार पाडणार लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या 10, शिंदे गटाच्या 6 तर अजित पवारांच्या 4 आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश होऊन शपथविधी सोहळा पार पडणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत 14/11 च्या शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी आय कॉन्टॅक्ट टाळला,केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना नमस्कार ; मुख्यमंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये दुराव्याच्या चर्चा ; एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा दीपक केसरकरांनी फेटाळल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका दिपक केसरकरांनी सांगितली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे सावध! उद्धव ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेतली
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट,महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका,तिन्ही पक्षप्रमुख एकत्र बसून ठरवतील, एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नसल्याचं केलं स्पष्ट ; उदयनराजे भोसले यांचं शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग,चार आमदारांसह भेटीगाठी सुरु
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शंका व्यक्त, मविआ नेते इव्हीएमच्या मुद्यावरुन आक्रमक ; पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा देण्याचे संकेत,वकिलांची टीम तयार करा, शरद पवारांचे आदेश ; इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय;जिंकला की इव्हीएम चांगलं, पराभूत झाला की छेडछाड दिसते, याचिकाकर्त्याला झापले
केंद्रात कॅबिनेट मंत्री करा,आणखी एक मंत्रिपद,राज्यात कॅबिनेट,विधानपरिषद आणि चार महामंडळं द्या;रामदास आठवलेंकडून मागणीची यादी सादर
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव,माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,सामाजिक चळवळीत सक्रीय राहणार असल्याची माहिती
केंद्राची पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी,क्यू आर कोड असलेलं पॅनकार्ड विनामूल्य मिळणार,आयकर विभागाच्या 1435 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स;लेखक संजय दुधाणे यांच्याकडून पुणे कोर्टात दावा ; नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर,28 नोव्हेंबरला पुण्यात वितरण सोहळा
बिहारचा वैभव सूर्यवंशी 13 व्या वर्षी करोडपती, लेकाच्या स्वप्नासाठी बापाने खस्ता खाल्ल्या, शेतही विकलं, राजस्थान रॉयल्सनं ज्या वैभवसाठी 1.10 लाख मोजले त्याचा धगधगता संघर्ष!