ताज्या घडामोडी

पवना सहकारी बँक निवडणूकीत पवना प्रगती पॅनल रिंगणात..

आज बैठकीमध्ये सर्व ८ उमेदवारांनी पवना प्रगती पॅनल ची घोषणा केली असून निवडणुकीला सामोरे जाण्यास एकमत.

पवना सहकारी बँक निवडणूकीत पवना प्रगती पॅनल रिंगणात.Pavana Pragati Panel in the Pavana Cooperative Bank Elections.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २६ मार्च.

 

आज दि. २६/०३/२०२३ मा. भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली, या मध्ये प्रामुख्याने एकूण ८ उमेदवार उपस्थित होते, सदरील निवडणूक ही समोपचाराने व शांततेने पार पडावी असे सर्वांचे आग्रही मत होते.

परंतु मा. ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनल मध्ये कोणालाही विचारात घेतले नाही अथवा चर्चा देखील केली नाही. आम्ही सर्व माघार घेणार आहोत असे गृहीत धरून मनमानी पद्धतीने पॅनल ठरविण्यात आला, त्यामुळे  इतर उमेदवार नाराज झाले असून सर्वांनी एक मताने निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे.  भाऊसाहेब भोईर यांची सुरुवाती पासून सदर निवडणूक समोपचाराने पार पाडण्याची आग्रही भूमिका होती.

 

तसेच भाऊसाहेब भोईर यांनी देखील निवडणूक न लढण्यासाठी विनंती केली परंतु सर्व इच्छुक उमेदवार यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तसेच आम्ही तयार करत असलेल्या पॅनल मध्ये  भाऊसाहेब भोईर यांना देखील OBC गटातून निवडणूक लढवावी अशी इतर इच्छुक उमेेदवारांनी त्यांना विनंती केली, परंतु आमच्या विनंतीस मा. भाऊसाहेब भोईर यांनी नकार दिला.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 

आम्ही सर्व उमेदवार हे स्व.आण्णासाहेब मगर यांना आदर्श मानतो. तसेच आदरणीय ज्ञानेश्वर लांडगे साहेब यांना आम्ही दैवत मानतो तसेच मा. वी. एस. काळभोर साहेब व गराडे साहेब हे आमचेसुद्धा प्रमुख मार्गदर्शक आहेत. परंतु आम्हा सर्वांना वेठीस धरून इतर पदसिद्ध संचालक हे अनेक वर्षांपासून बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. त्यामुळे आज बैठकीमध्ये आम्ही सर्व ८ उमेदवारांनी पवना प्रगती पॅनलची घोषणा केली असून निवडणुकीला सामोरे जाण्यास एक मत झाले आहे.

 

त्याच प्रमाणे सदर पवना प्रगती पॅनल चे प्रचार प्रमुख व प्रवक्ता म्हणून अमर कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभासदांना आश्वासन देतो कि काही कुटुंबांच्या सभोवताली केंद्रित असलेली ही पवना बैंक आम्ही मुक्त करू, त्याच प्रमाणे प्रशासकीय बाबीमध्ये ज्या त्रुटी आहेत दूर करण्याचा प्रयत्न करू. तसेच बँकेची आधीपेक्षा जास्त गतीने प्रगती कशी होईल यावर भर देऊ, पवना प्रगती पॅनल मध्ये सर्व साधारण पुरुष गटात  अमर कापसे, विलास भोईर, दिलीप नाणेकर, दत्तात्रय दातीर पाटील महिला सर्वसाधारण गटात  योगिता कलापुरे,  नमिता तपकीर, भटक्या विमुक्त जाती गटात वैभव कुन्हाडे व अनुचित जाती जमाती गटात चंद्रकांत कांबळे असे एकूण ८ उमेदवार पवना प्रगती पॅनल मध्ये सहभागी आहेत.

पवना प्रगती पॅनलला सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे व जेष्ठ नेते. अशोक काळभोर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच ते प्रकाशक म्हणून देखील काम पाहणार आहेत, अशी माहिती अमर कापसे यांनी आवाज न्यूजला दिली.

 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!