ताज्या घडामोडी

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या 

मोहन चौकेकर

आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य ; देवेंद्र फडणवीस काहीही म्हटले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्राचे नेते निर्णय करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित, महिला, शिक्षण आरोग्य, पर्यावरणसह कृषी धोरणाचा समावेश ; राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे, शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत, उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी ठेवले बोट 

 देवेंद्र फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला ‘बटेंगे तो कटेंगे’ पसंत नाही; अजित पवारांचं वक्तव्य ; देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊतांची टीका 

 मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं सिल्लोडमध्ये मोठं वक्तव्य, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं आवाहन ; लिहून घ्या! महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील, संजय राऊतांचं मोठे खळबळजनक वक्तव्य 

 आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट ; 15/11/2024गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची रेघ, यवतमाळमध्ये डॉ.अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका ; सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी, उमरेडमध्ये अमित शाहांची महाविकास आघाडीवर टीका 

उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मला नको होतं, म्हणून मी शिवसेना सोडली, नाराण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेबांना 6 पानी पत्र दिल्याचाही केला उल्लेख ; आम्ही सगळे एकत्रच, ‘ना बटेंगे ना कटेंगे’, अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर ; बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका; अजित पवार म्हणाले मी त्याचं समर्थन करत नाही 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 बोलायला उभा राहिलो की अनेकवेळा पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा ; वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार ; माझ्या विरोधात लेकीला उभं करून पवार साहेबांनी राजकीय जीवनातली मोठी चूक केली; धर्मरावबाबा आत्राम यांचा घणाघात 

 सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींनी केल्या मोठ्या घोषणा ; राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, प्रकृतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घेण्याचे केले आवाहन 

 हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात ; सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, सोलापूर जिल्ह्यात चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर 

 युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, राजकीय नेत्यांना दिली 8 आव्हानं, अटी पूर्ण करणाऱ्यांचा निवडणुकीत प्रचार करणार ; नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!