ताज्या घडामोडी

संकल्प सिद्धीचा महामंत्र– जोपासा जीवन मूल्यांचं तंत्र ! डॉक्टर शालिग्राम भंडारी..

चारित्र्यसंपन्नता आणि मानवी मूल्य जपणारी आणि जोपासणारी व्यक्ती निश्चितच यशाची धनी होऊ शकते !

संकल्प सिद्धीचा महामंत्र– जोपासा जीवन मूल्यांचं तंत्र ! डॉक्टर शालिग्राम भंडारी..Mahamantra of Sankalp Siddhi– Cultivate the technique of life values! Doctor Shaligram Bhandari..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, विशेष लेख १९ मार्च.

वरील शाश्वत सत्याला पुष्टी देणारा एक किस्सा आहे तो म्हणजे— नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक सी व्ही रमण आणि प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या बाबतीत घडलेला! निवृत्तीनंतर सी व्ही रमण यांनी बंगळूर येथे संशोधन संस्था सुरू केली होती.

त्यासाठी त्यांना तीन भौतिक शास्त्रज्ञ हवे होते. त्यांची भरती करण्यासाठी प्राध्यापकांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली, अनेक शास्त्रज्ञांनी अर्ज केले! त्याचं कारणही असं होतं की- मुलाखतीला येणाऱ्या शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की- जरी आपली निवड झाली नाही तरी- निदान नोबेल पुरस्कार विजेत्या सन्माननीय प्रोफेसर रमण यांना आपल्याला भेटण्याची संधी मिळेल.

कारण अंतिम मुलाखत प्राध्यापक सी व्ही रमण हे स्वतःच घेणार होते. अंतिम फेरीतील पाच पैकी तिघांची निवड करण्यात आली! अंतिम फेरीतील न निवड झालेला शास्त्रज्ञ हा प्राध्यापक रमण यांना दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसच्या ग्राउंडवर घुटमळताना दिसला. त्याच्या संवादातून प्राध्यापक रमण यांना असे कळले की- प्राध्यापकांच्या ऑफिसने त्याला सात रुपये जास्त दिलेले आहेत, ते परत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आहे म्हणून मी इथे आपली भेट घेण्यासाठी थांबलो आहे असे त्याने प्राध्यापकांना सांगितले. सर्वप्रथम प्राध्यापकांनी ते पैसे स्वीकारले पण त्याच वेळी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता परत मुलाखतीला येण्याची विनंती केली! प्रा रमण त्या तरुणाला म्हणाले की– तू भौतिकशास्त्राच्या परीक्षेत जरी नापास झाला असलास तरी– तू मात्र प्रामाणिकपणाच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी झाला आहेस- म्हणूनच मी तुझ्यासाठी एक खास पोस्ट तयार करतो आहे ! त्याला नंतर प्रा रमण सरांबरोबर काही वर्ष संशोधन करण्याची संधी मिळाली.

 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 

पुढे हाच तरुण सन 1983चा नोबेल पारितोषिक विजेता ठरला! त्या तरुणाचे नाव होते प्राध्यापक सुब्रमण्यम चंद्रशेखर!  या घटनेच तात्पर्य इतकेच आहे की– आपले कठोर परिश्रम- त्यात असलेल् सातत्य आणि आपलं बुद्धी कौशल्य असूनही कदाचित आपल्याला यश मिळेलच याची खात्री देता येत नाही तथापि – चारित्र्यसंपन्नता आणि मानवी मूल्य जपणारी आणि जोपासणारी व्यक्ती निश्चितच यशाची धनी होऊ शकते! हेच या घटनेच द्योतक आहे.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!