महाराष्ट्र
पंडीत जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजीनगर,
देशाचे प्रथम पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगिता राठोड, नायब तहसिलदार मनोज बारवाल, वसुधा बागुल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.