धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी आज सभागृहात बुलढाणा मतदार संघ तसेच जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रश्नांवर आवाज उठवला!

मोहन चौकेकर
आज दिनांक 20 डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी राज्य शासनाच्या नगर परिषद, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध प्रश्न सभागृहात मांडले.
प्रमुख मागण्या आणि विषय:
1️⃣ नगर परिषद व नगरपंचायतींचा विकास आणि आर्थिक अडचणी:
– राज्यातील ४५० पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात.
– मात्र, या विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्राचे प्राधिकरणांकडून तांत्रिक मंजुरी घेण्यासाठी नगरपरिषदांना १% ते १.५% शुल्क भरावे लागते.
– यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नगर परिषदांना विकासकामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
– मागणी:
– तांत्रिक मंजुरीसाठी नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये कार्यरत तांत्रिक अधिकाऱ्यांना थेट अधिकार प्रदान करावेत.
– रु. ५० लाखांपर्यंतच्या कामांसाठी विनाशुल्क तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार देण्यात यावा.
– यामुळे नगरपरिषदेच्या निधीची बचत होऊन स्थानिक विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होईल.
2️⃣ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुधारणा:
– जिल्हा सामान्य रुग्णालयाची जुनी प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण असून, नवीन प्रशासकीय इमारत उभारणे गरजेचे आहे.
– जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत ट्रॉमा केअर युनिट चे स्वतंत्र स्वरूपात रुपांतर करून लाईफ सपोर्ट सेंटर उभारावे.
– ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे स्वतंत्र ट्रॉमा केअर युनिट मंजूर करावे.
– बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, मोताळा भागांमध्ये किडनीचे आजार वाढत असल्याने डायलिसिस युनिट उभारावे.
– मानसिक आरोग्य केंद्रासाठी नवीन अद्यावत इमारत आणि ३० बेडची क्षमता वाढवावी.
3️⃣ स्वास्थ्य कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि सुविधा:
– जिल्हा आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
– अधिग्रहीत नर्सिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन इमारत व विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारण्याची मागणी केली.
4️⃣ इतर महत्त्वाच्या मागण्या:
– जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी अधिक अधिकार प्रदान करून विकासकामे अधिक गतिमान करावीत.
– सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी तातडीने पावले उचलावीत.
विधानसभा सभागृहात बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या सर्व मागण्या धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी मांडल्या. विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले..