स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये मारली उत्तुंग भरारी

जालना प्रतिनिधी – गौरव बुट्टे
नागपूर येथून आयोजित केली गेलेली नॅशनल लेवल ओपन अबॅकस कॉम्पिटिशन घेण्यात आली होती या कॉम्पिटिशनमध्ये 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये स्मार्ट किडस अबॅकस अकॅडमी जालना येथील 14 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले, त्यामध्ये लेवल वाईस कॅटेगिरी वाईस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्या विद्यार्थ्यांमध्ये आराध्या जाधव, श्रीराज बुट्टे, नैतिक गडवे,देवांश मेटकर, राहील शेख, सार्थक गिरी, अथर्व गिरी, मनस्वी दांडगे, सिद्धी शिंदे,अंजनी खंदारकर, शरयू खंदारकर, सिद्रामोमीन, आशु अमिन शेख, समृद्धी छडीदार, या विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 95 मार्क मिळवून फर्स्ट रँक मिळविला असून त्या विद्यार्थ्यांचा नागपूर येथे गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना जालना स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ जयश्री बुट्टे यांचा मार्गदर्शन मिळाले, या कार्यक्रम स्थळी विद्यार्थी आणि पालक भरपूर संख्येने उपस्थित होते.