न्यायासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळांचे सक्षमीकरण आवश्यक! आमदार संजय गायकवाड

मोहन चौकेकर
आज दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये महत्वाची लक्षवेधी उपस्थित करताना महत्वपूर्ण विषय धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहात मांडले…!
राज्यातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये ४४७ पदे रिक्त,तर ६,४३,२४२ नमुने प्रलंबित आहेत. यामुळे फौजदारी न्याय प्रक्रियेत मोठा अडथळा येतोय. आरोपींविरुद्ध ठोस पुरावे मिळत नाहीत आणि निर्दोष व्यक्तींवर अन्याय होतोय…!
५० वर्षांपूर्वीची जुनी व्यवस्था अद्याप कार्यरत आहे. धर्मवीर आमदार संजय गायकवाड गायकवाड यांनी सभागृहात शासनाला जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षा विमा कवच लागू करण्याची मागणी केली आहे…!
तपास प्रक्रियेसाठी आधुनिक व्यवस्था निर्माण करून प्रलंबित नमुने आणि रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे असे सांगितले..!
तसेच न्याय व्यवस्थेला बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे असे देखील या वेळी धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.