दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या

मोहन चौकेकर
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा व मंत्रीमंडळाचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 1 ताप, असल्याने दिवसभर दरे गावातील घराबाहेर पडले नाहीत, डॉक्टरांकडून तपासणी ; राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून उद्धव ठाकरेंचा टीका ; बाबा आढाव यांचे इव्हिएम विरोधी असलेले उपोषण सुटले
शरद पवारांचा बाबा आढावांच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले, ‘निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याअगोदर कधीच दिसला नाही’ ; जनतेचा पाच महिन्यांत कौल बदलला, आम्ही काय करणार? अजित पवारांचा बाबा आढाव यांना सवाल, प्रलोभनावरही दिलं उत्तर
सत्तास्थापनेआधीच नागपुरातही हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांचा डिजिटल व्यवस्थेत पाहुणचार होणार, 16 ते 24 डिसेंबरदरम्यान होईल नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी साईदरबारी शपथविधीची तारीख सांगितली, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ ; गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचें वक्तव्य
विधानसभेला मित्रपक्षांनी पाठीत केला वार! स्थानिक स्वराज्य संस्थावेळी मविआ नको, सोलापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची भूमिका ; EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, माळशिरस तालुक्यातील माकरवाडी गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळं माहितीय; महादेव जानकर म्हणाले ईव्हीएमविरुद्ध मोठं आंदोलन उभारणार
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
मध्य प्रदेशात दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना; 30 जण होरपळले, पंधरा गंभीर, 18 आयोजकांवर गुन्हे दाखल ; छत्तीसगडमध्ये संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; मिचेल मार्शलाही दुखापत ; टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ