जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
100 शिक्षक कल्ब ऑफ जालना तर्फे आयोजित चित्रकला व सामान्य ज्ञान स्पर्धेत जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक -कु.श्रेया अनंता भूक्तर, द्वितीय क्रमांक -अल्फिया सद्दाम शेख, तृतीय क्रमांक -मुस्कान अनिस शेख, उत्तेजनार्थ क्रमांक -राजवीर सचीन आदमाने व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक -किरण माणिक आदमाने, द्वितीय क्रमांक -मयुरी अपील आदमाने, तृतीय क्रमांक -संदीप बालासाहेब चौभे यांनी पटकाविले.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीना संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंतराव टकले, उपाध्यक्ष रामकिशन पारे,सचीव संजय बोबडे, सहसचिव पुंडलिक गाडेकर, कोषाध्यक्ष रामराव तुपे, सदस्य भोगीलाल हजारे, संजय पारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.