जालना शहरातील चंदनझिरा परिसरात अर्जुन पंडितराव खोतकर यांची जोरदार निर्धार सभा.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
जालना शहरातील चंदनझिरा परिसरात श्री अर्जुन पंडितराव खोतकर यांची जोरदार निर्धार सभा.जालना विधानसभा मतदारसंघ १०१ मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 08 व 09 मधील चंदनझिरा येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अर्जुन पंडितराव खोतकर यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी परिसरातील सर्व लोकांनी श्री अर्जुन पंडितराव खोतकर यांचं असंख्य चंदनझिरा परिसरात लोकांनी जोरदार असं स्वागत केलं.यावेळी लोकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा उत्साह आपल्या हक्काचा माणूस आपल्या भेटीस आल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावरती व्यक्त होताना दिसते होता. या प्रसंगी अर्जुनभाऊ खोतकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसेच जालना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामीण असो व शहरी भागाचा विकास आराखडा बद्दल माहिती दिली त्याचबरोबर आपण विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांकडे 300 ते 400 कोटी रुपये निधी हा जालना विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी आणला आहे व जालना विधानसभा मतदारसंघाततील प्रत्येक ठिकाणी सर्वांगीण विकास साधला व पुढील काळात आपण साधणार आहोत.भविष्यात जालना मतदारसंघास समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी मी विकास आराखडा बनविला आहे. पाच वर्षात थांबलेल्या विकासाची पोकळी भरून काढायची व जालना मतदारसंघास पुन्हा एकदा विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे.याप्रसंगी उपस्थित भाजप- शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – – रिपाइं महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, व मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या भावाला बळ देण्यासाठी आलेल्या महिला भगिनी, तसेच सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.