आपला जिल्हा

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा चंदनझिरा वतीने 

जालना प्रतिनिधी

  शालांत परीक्षा २०२५ मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जि. जालना येथील विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 10 वी च्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा चंदनझिरा यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांना पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

शाळेतुन प्रथम क्रमांक लवप्रीत कव्हळे, द्वितीय क्रमांक .साक्षी खरात तृतीय क्रमांक किरण उरदुखे व विशेष प्राविण्य पायल कांबळे,धीरज खरात यांनी मिळविले.

        यावेळी संस्थेचे शाखा व्यवस्थापक जय राऊत यांनी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था चंदनझिरा शाखेचे विविध वैशिष्ट्य व योजनेची माहिती उपस्थित विद्यार्थी व पालकांना दिली.पतसंस्थेत नागरीक व विद्यार्थी साठी असलेल्या वैशिष्ट्ये पटवून दिले. 

याप्रसंगी राजेश सुर्यवंशी , वैभव वझरकर, सुभाष पारे , गणेश दिघुळे, संतोष गुरव, रमेश तुपे, गणेश थोरात, गणपत भद्रे, सुरेश जोहरे, अभिषेक जोहरे, कौशल्याबाई खरात, रमेश कांबळे उपस्थित होते व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!