लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची जयंती अकोला निकळक येथे साजरी.

बदनापूर प्रतिनिधी बाबासाहेब केकान
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती अकोला निकळक येथे साजरी. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची७५ वि जयंती अकोला निकलक येथे उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे व शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे , विधानसभा संघटक कैलास दुधनी , अकोला येथील सरपंच महादू गिते अनिल कोलते, बद्रीनाथ पठाडेआणि गावकरी मंडळी हजर होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे दूरदर्शी नेतृत्व तसेच सर्व समाजाचा विचार करणारे व्यक्तिमत्व होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाती धर्माच्या लोकांना मानाचे स्थान दिले आहे त्यांचाच आदर्श घेऊन पंकजाताई व प्रीतम ताई वाटचाल करत आहे यावेळी आमदार म्हणाले की विधानसभेच्या त्रिपक्ष म्हणून शिवसेना व भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे मीदेखील मुंडे यांच्या तालमीतला घडलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे पंकजाताई ह्या आमच्या नेत्या आहेत त्यांना आमचा कायमचा पाठिंबा राहील.