आपला जिल्हा
शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावरच कापूस विक्री करावा.

बदनापूर प्रतिनिधी -बाबासाहेब एकनाथ केकान
पांढऱ्या सोन्याला ७५००भाव भोकरदन येथील सिद्धार्थ फायबर जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये सीसीआय तर्फे१२ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे यावेळी बाजार समितीचे सचिव संतोष ढाले व कापूस खरेदी केंद्रप्रमुख नरेंद्र देसले व इतर शेतकरी यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ७५०० इतका प्रति कुंटल प्रमाणे भाव देण्यात आला यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते त्यांनी सीसीआयचे आभार मानले व इतर शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्राला आपला कापूस विक्री करावा असे आवाहन केले.