जिल्हातील आठ तालुक्यांतील वर्षभरात 105 बालविवाह रोखले

जालना प्रतिनिधी
जिल्ह्यासह देशभरात गुरुवारी (दि. 13) बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. एका वर्षात 105 बालविवाह रोखण्यात आले असून एका बालकामगाराची जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने सुटका केली आहे. समाजातील बालविवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी. 14 ते ता. 20 नोव्हेंबर दरम्यान
बालकामगार, बालविवाह, बाल भिश्नेकरी, बाल लैंगिक अत्याचार , अनाथ, स्थलांतरित, हरवलेली मुले या बाल संगोपन आणि संरक्षणा अंतर्गत प्रमुख समस्या आहेत. यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. पण, यासाठी पालक, कुटुंब, समाज, शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था या सर्व स्तरांतून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. – कोमल कोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
बालहक्क सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, परतूर, मंठा, जालना आणि घनसावंगी. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत १०५ बालविवाह रोखण्यात आले, तर एका बालकामगाराची सुटका करण्यात आली. जालना तालुक्यात सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आले आहेत.