माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्यावतीने दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जालना (प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांच्या वतीने दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून स्नेह मिलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, राजेशजी राऊत, विजयजी कामड, विमलताई आगलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलतांना माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, दीपावली स्नेह मिलन हे एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व प्रकाशाच्या आणि आनंदाच्या सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा, तुम्हालाही सुख, समृद्धी, आरोग्य, कीर्ती, आणि आनंद मिळो हीच देवी महालक्ष्मी चरणी प्रार्थना.
यावेळी पुढे बोलतांना माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत मी राज्याचा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक प्रमुख आहे. राज्य सरकारने जनतेच्या कल्याणाचे व हिताचे निर्णय घेतले आहे आणि हेच सरकार पुन्हा राज्यात आलं पाहिजे अशा प्रकारची भावना राज्यातल्या जनतेची झालेली आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ या राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सरकार येणारे याची पूर्ण खात्री आहे.
या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमास डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर, उद्योजक, भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थीत होते