आपला जिल्हा

हृदयात राम आणि हाताला काम देणारे आमचे हिंदुत्व – उद्धव ठाकरे

जालना प्रतिनिधी

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही आणि हा महाराष्ट्र कदापि मग करणार नाही. महाराजांच्या अपमानाचा सूड आम्ही उगवणार. घर पेटवणारे, हिंदू – मुस्लिम दंगल पेटवणारे आमचे हिंदुत्व नाही.  हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व आहे. घरातली चूल पेटवणारे आमचे हिंदुत्व असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतूर येथे केले. परतूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आसाराम बोराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा.संजय जाधव,उपनेते लक्ष्मण वडले, माजीमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल,राजेश राठोड, उमेदवार आसाराम बोराडे, राष्ट्रवादीचे पंकज बोराडे, कपिल आकात, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभेत सपाटून मार खालल्यानंतर मोदी – शहा महाराष्ट्रभर मत मागत फिरत आहेत. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचार आरोप केले त्यांचाच प्रचार करण्यासाठी हे आहेत. मोदी – शहांचा फोटो म्हणजे पराभवाची गॅरंटी आहे.म्हणूनच सगळीकडे ते शिवसेना प्रमुखांच्या मी काढलेला फोटो वापरत आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात नेऊन मुंबई देखील अदानीच्या घशात घालण्याचे मोदी – शहा करत आहेत. या निवडणूक यांना घरी पाठविण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करणार असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, मला शेतीतलं फारसं कळत नाही, मात्र शेतकऱ्यांचं हृदय कळतं,त्यांच्या अडचणी कळतात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण आम्ही देणार. तसेच जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवू, आणि शेतकऱ्याचे कुठेही नुकसान होऊ देणार नाही. महिलांना मोफत प्रवास तसेच तरुणांना रोजगारसह मासिक भत्ता देऊ अशी घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली आहे.  तसेच भाजपने मुंबई महाराष्ट्रीतील उद्योग धंदे गुजरात पळविले आणि मुंबई अदाणीच्या घशात घालीत असल्याची जोरदार टीका भाजपवर केली आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!