वकील महासंघाचा आमदार संजय शिरसाट यांना जाहीर पाठिंबा ; आमदार संजय शिरसाट यांचे वैयक्तिक गाठीभेटी वर लक्ष

मोहन चौकेकर
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आमदार संजय शिरसाट यांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे.
पदयात्रा – कॉर्नर बैठकी बरोबरच संजय शिरसाट यांनी वैयक्तिक गाठी भेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे आज त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय येथे वकील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची भेट घेतली.
वकील महासंघाचे अध्यक्ष ॲड.मिलिंद पाटील ,सचिव ॲड.तीर्थराज सावरे, उपाध्यक्ष ॲड.सुनील पडूळ यांनी संजय शिरसाट यांचा सत्कार करून वकील महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा ची घोषणा केली व पश्चिम विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या वकिलांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ॲड. राजेश काळे , सह सचिव करण गायकवाड,महीला उपाध्यक्षा ॲड .सुवर्णा डोणगावकर, ॲड. ममता झाल्टे, ॲड. सुप्रिया कंनगरे ,ॲड.सोमनाथ लढ्ढा, ॲड.व्ही.के.जाधव,ॲड.कैलास ढगे, ॲड.राहुल भगत, ॲड .गणेश गवळी, ॲड. कैलास जाधव, ॲड. राहुल जमदाडे , ॲड.संदीप कोल्हे, ॲड.आशिष कोलते, ॲड.शाहरुख खान ,ॲड.योगेश सुरडकर, ॲड.सुधीर तेलगोटे आदी वकील महासंघाच्या कार्यकारणी सदस्यांची उपस्थिती होती.