अनिल पाटील तिरुखे यांच्या इलेक्टिक चार्जिंग गाडीचा स्फोट.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
नागेवाडी येथील समाजसेवक अनिल तिरुखे यांच्या गाडीला रात्री उशिरा अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनिल तिरुखे हे रात्री उशिरा आपले काम करून 1 वाजता घरी आले असता त्यांनी आपली इलेक्ट्रिक चार्जिंग वरची गाडी एक्स व्ही 400 महिंद्रा कंपनीची ही गाडी चार्जिंग करण्यासाठी लावली आणि ते घरात निघून गेले. दहा ते पंधरा मिनिटातच गाडीचा मोठा स्फोट झालेचा आवाज आला. त्यात गाडी पूर्ण जळून खाक झाली. त्यांचे पार्किंग चे स्टॅन्ड ही यात जळून खाक झाले. परिसरात उशिरा पर्यन्त एकच खळबळ उडाली होती. या घटनेत कोनाला ही जीवित हानी झाली नाही. अनिल तिरुखे यांनी महिंद्रा इलेक्ट्रिक चार्जिंग गाडीच्या कंपनीला कॉल करून गाडीच्या झालेल्या घटने विषयी माहिती दिली. झालेल्या नुसकान भरपाई करून देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.