ताज्या घडामोडी

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या 

मोहन चौकेकर

यवतमाळच्या वणी येथे बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे भडकले, स्वत: व्हिडीओ शूट करुन म्हणाले, युरीन पॉट पण तपासा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बॅग तपासल्याचाही व्हिडिओ मला पाठवा ; माझी बॅग तपासली तशी नरेंद्र मोदी, अमित शाह, दाढीवाल्या मिद्यांची, (एकनाथ शिंदे ),गुलाबी जॅकेट वाल्याची, (अजित पवार ) टरबूजची ( देवेंद्र फडणवीस)बॅग तपासली हवी की नको ? अश्या जहाल व टोचणाऱ्या शब्दामध्ये उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेतून खोचक सवाल

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज, पण मराठवाड्यात फटका; IANS-Matrize चे सर्वेक्षण, महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता ; विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार असा अंदाज, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार म्हणाले, 175 जागा जिंकण्याचा प्रयत्न तर संजय राऊत म्हणाले, सर्व्हेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही

राष्ट्रवादीच्या तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार नाही, 70 जागांपैकी 31 ते 38 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होण्याची शक्यता, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर ; मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

राज ठाकरेंनी त्यावेळी रक्ताचं नातं जपलं, अजूनही वेळ गेली नाही; अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंना साद ; माहीम मतदारसंघात सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; प्रचारफेरीदरम्यान दारातूनच परत पाठवलं, सरवणकर म्हणाले ती महिला ठाकरेंच्या शिवसेनेची, दारुअड्डा चालवणारी

मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला ; अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवार म्हणाले 23 तारखेला बघू

बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवर राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; वाह्यात म्हणत भाजपवर टीका ; मीही निवृत्त होणार पण 20 वर्षानंतर; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराचं तेव्हाच ठरवू

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, भाऊसाहेब कांबळेंचं ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल ; छगन भुजबळांच्या रडावर असलेल्या सुहास कांदेंसाठी सुपरस्टार गोविंदा मैदानात! रोखठोक भाषणाने व्यासपीठ गाजवलं

देशाच्या 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती, राष्ट्रपतीभवनात घेतली शपथ!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक संजय बांगरच्या मुलावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची अनया झाली, VIDEO व्हायरल ; ना नीट शब्द… ना नीट बोलण्याची पद्धत; संजय मांजरेकरांनी गौतम गंभीरला सुनावले, BCCIला दिला सल्ला

लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

चर्चा तर होणारच! हिंदुत्त्ववादी भाजपा नेत्या माधवी लता यांनी केली धनुष्यबाण मारतानाची कृती; सोलापुरात एकच जल्लोष

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!