जीवनराव पारे विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
जीवनराव पारे विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यीनी कु.कोमल सोनवणे व कु.पायल सुर्यनारायण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या व भारताला प्रगत देश बनविण्यासाठी नेहमी अग्रेसर राहिले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांसोबत बोलणे चांगले वाटायचे ते नेहमी लहान मुलांसोबत रमायचे ,त्यांचे म्हणणे होते की लहान मुले देशाचे भविष्य आहे.त्याचा विकास होणे गरजेचे आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनपटावर कु.अश्विनी ताठे हिने प्रकाश टाकला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे,सशि.माधव भद्रे, नारायण राजेभोसले, ओमप्रकाश एखंडे व विद्यार्थी उपस्थित होते.